नमस्कार मी बापूसाहेब सोनवणे आपले स्वागत करतो.



सुस्वागतम शैक्षणिक माहितीबरोबरच इतरही अनेक प्रकारची माहिती देणाऱ्या या व्यासपीठावर आपले स्वागत आहे.

Tuesday, 4 October 2016

अभयारण्य पाहून जंगल समजत नाही!

अभयारण्य पाहून जंगल समजत नाही!
(भाग २)
पहिलेपणाचा आनंद वेगळाच असतो. जसं ९२ साली मी पहिल्यांदा ‘कान्हा’ पाहिलं, तेंव्हाचा आनंद मला आजून आठवतो! एवढ मोठं जंगलं, त्या जीप्सीज, रेस्टहाउस, ती चितळ, ते कान्हातले रस्ते, तो वाघ दिसणं, तो माहोल.... मन अगदी आभाळ झालं होतं! मागच्या भागात मी वर्णन केलंय, अगदी तसंच! पण तो पहिलेपणाचा आनंद होता. दुसऱ्या वेळी आनंद निम्म्याने कमी आला. आणि पुढेपुढे तर मला या सगळ्या गोंधळात आनंद वाटेनासा झाला. जिम कोर्बेट पासून सायलेंट व्हॅली पर्यंत अनेक जंगलं फिरलो. पण प्राणी दिसणे, या पलीकडे ज्ञानात फारशी भर पडली नाही. पूर्वी पेशवे पार्कमध्ये प्राणी दिसायचे. ते पिंजऱ्यात असायचे. इथे जंगलात असायचे. फारसा फरक वाटेना. त्यातून प्रत्येक वाघाची नावं वगैरे ऐकून मूडच जाऊ लागला. काहीतरी चुकत होतं...
कोयानेचं जंगलं आणि पश्चिम घाटांवरच्या जंगलातून मी आडमाप फिरलोय. पावसाळ्याचे महिने धरून प्रत्येक महिन्यात किमान चारचार दिवस, असा वर्षानुवर्ष फिरलोय. ज्या ठिकाणी माणूस सोडाच, पण माणसाचं कुठलंच अस्तित्व जाणवत नाही, आशा जंगलांमध्ये राहीलो आहे. या जागलांमध्ये मला जे अनुभव आले, जो आनंद आला, तो इतका खर्च करून, इतका आटापिटा करून, सहासहा दिवस खर्च करूनही व्याघ्रप्रकाल्पांमध्ये आला नाही. प्राणी दिसले आणि फोटो काढले, याव्यतिरिक्त सांगण्यासारखं फारसं काही नाही! असं का झालं असावं?
व्याघ्रप्रकाल्पां इतक्या संख्येनं प्राणी मी कोयानेचं जंगलं आणि पश्चिम घाटांवर पाहिले नाहीत. यात काहीच वाद नाही. जरी सगळे प्राणी अनेकदा पहिले असतील तरी दहापंधरा वाघ चार दिवसात वगैरे अचाट प्रकार मला कान्हातच करता आले. कोयानेचं जंगलं आणि पश्चिम घाटांवरच्या जंगलात मोठे प्राणी दिसले, पण इतक्या संख्येनं नाही! छोटे जीवच जास्त दिसले. तरीही मला याच जंगलांमध्ये जास्त आनंद आला, जास्त ज्ञान मिळालं. कारण सांगतो...
व्याघ्रप्रकाल्पात जाताना आपण खूप प्रवास करून जातो. कानात आणि डोक्यात तो प्रवास, ती रेल्वे, त्या गाड्या यांचे आवाज असतात. चोवीसेक तासांनी आपण एखाद्या सुसज्ज रेस्टहाउस मध्ये शिरतो. सुंदर रूम्स, आरामदायक डबल बेड्स, रग, एसी, सुंदर मोठ्या बाथरूम्स, गरम पाण्याचे शोवर्स, कमोड वगैरे.... जेवणाचा थाट तर विचारू नका! सूप, उत्तम नाष्टा, पंजाबी जेवण, चहा, कॉफी, बिस्कीट... काय नाही ते विचारा! मग कॅम्प फायर, एखादा फिल्म शो...
मग पहाटे ती जीप येणार, चकाचक कपडे घालून जीपमध्ये बसायचं, जीप्सची गर्दीच गर्दी! किती? शंभर दीडशे जीप्स. तिकीट वैगरे सोपस्कार कोण करतं कुणास ठाऊक? मग जंगलात शिरणं... तो गाईड काहीतरी बडबडत असतो. हिंदीत... मग ती चितळ, संबरं, भेकारं, रानडुकर, रानकुत्री, मोर वगैरे.. मग दोन तीन फेऱ्यात वाघ! मग गंगेत घोडं नहालं... तेच ते, तेच ते... तारीख पे तारीख, तारीख पे तारीख... मी नंतर अनेकदा विचार केला, यात मला जंगलाचा आनंद का येत नसावा?
पाहिलं म्हणजे मला जंगलाचं ’फील’ यायला माझी शहरी जीवनाशी असलेली नाळ तुटावी लागते! आपण कितीही जंगलाच्या आत गेलो, तरी डोक्यात ती गाणी, ते रेस्टहाउस, तो एसी, कमोड, ती अलिशान बाथरूम, ती स्वादिष्ट जेवणं, ज्या जीप मध्ये आपण बसलो आहोत ती जीप, अंघोळ केल्याचा स्वच्छपणा, त्या दुर्बिणी, कामेरे, कधीकधी सेंटचे वास... आपली शहरी नाळ तुटतच नाही! जंगलात असतानाही आपण अत्यंत संरक्षित वातावरणात असतो. मध्ये पिंजरा नसतो, त्या ऐवजी जीप असते. पण आपली मानसिकता ही प्राणीसंग्रहालायाचीच असते. प्राणी सोडून आपण जंगलातलं काहीच बघत नाही. कारण खाली उतरायला परवानगीच नसते! प्राणीसंग्रहालायात प्राणी बंद असतात, आपण मोकळे असतो. इथं ते मोकळे असतात आपण जीपमध्ये बंद असतो. मानसिकता तीच! मधल्या एका दृष्य किंवा अदृष्य पिंजऱ्यामुळे त्यांच्या आणि आपल्यात एक भिंत असते. एक दृष्य किंवा अदृष्य संरक्षण असतं.
म्हणूनच मला अभयारण्यात जंगलाचं ‘फील’ कधीच येत नाही. काहीही झालं तरी मी सुरक्षित आहे. परत जाणार आहे. माणसाच्या घरात झोपणार आहे. खाली गडी आहे. पांघरायला गरम पांघरूण आहे. आणि मुख्य म्हणजे रात्री जेंव्हा जंगलाचा सर्वात भीतीदायक काळ असेल, अंधार पडेल, मला काहीही दिसणारं नाही. जेंव्हा सगळं जंगलं जागं होईल, मला भीती वाटणारे प्राणी बाहेर पडतील, तेंव्हा मी रूममध्ये एसी लाऊन, रजईत, बंद खोलीत झोपलेला असेन....
म्हणजे अभयारण्यात मी मनाने कधीच निसर्गात मिसळू शकत नाही. नुसतं मनानंच नाही, शरीरानं, दिनचर्येनं, भावनेनं कशानंचं आपण त्या निसर्गाशी एकरूप होऊ शकत नाही. जंगलात प्राणी कसं जगात असतील? रात्र कशी काढत असतील, त्यांना थंडी वाजत असेल का? ते चपला बूट घालत नाहीत. त्यांना टोचत असेल का? मुख्य म्हणजे पावसाळा! जंगलात खूपच पाऊस पडतो. चारचार महिने पडतो. दिवसरात्र पडतो. अशावेळी ते काय करत असतील? कुठे आसरा घेत असतील? ओले गच्च भिजल्यावर त्यांना झोप कशी लागतं असेल? झाडं ओली, पानं ओली, माती ओली, खडक ओले, ओढ्यांना धोधो पाणी, त्यात जळवा, चावणारे किडे, कसं जगत असतील? यातला कुठलातरी प्रश्न अभयारण्य पाहताना पडतो का? म्हणूनच मी म्हणतो, अभयारण्य पाहून जंगलं समजात नाही!
तुम्हाला काय वाटतं?
‘जंगलं कसं पाहायला हवं?’... पाहूया पुढच्या भागात...
Shekhar n

Monday, 15 August 2016

भारतीय साप

भारतीय साप


साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांती मध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. हात व पाय नसल्याने ते जमीनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्द्ल जनमानसात भीतीची भावना आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. विषारी साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशीही वर्गवारी होउ शकते.
      हा ब्लॉग केवळ भारतीय सापांबद्दल माहीती देणारा आहे, या  मध्ये भारतीय सापांच्या जातिन्बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

भारतात विविध प्रकारचे साप आढळतात, त्यांच्या जाती खालील प्रमाणे.
*विषारी साप*
नाग
नागराज
मण्यार
फुरसे
घोणस
समुद्री साप
पोवळा
पट्टेरी पोवळा
चापडा

*बिनविषारी साप*
अजगर
धामण
तस्कर
गवत्या
वाळा सर्प
पाणसाप
हरणटोळ
दिवड
नाणेटी


*विषारी साप*:
    नाग Common cobra (Naja Naja Linnaeus-1758)
नाग हा भारताच्या उत्तरपूर्व आणि हिमालयात सोडून भारतात सव ठिकाणी सापडतो.
नागाला  भारतीय कायद्याच संरक्षण आहे (Schedule-II Part-II of WLPA-1972)


नाग हा विषारी  साप आहे. नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monocol) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडे इतर छोटे प्राणी व पक्षी आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.. नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.नागाची जास्तीती जास्त लांबी २.२ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. नाग हा धामण आणि खाई इतर बिन विषारी सापन्सारखा दिसत असल्याने त्यांना बघून नाग पहिल्याच गैरसमज होतो.
     नाग (Cobra) याच विष हे अत्यंत घटक असल्याने, तो भारतातील ४ कुप्रसिद्ध सापांपैकी एक आहे. ज्यांना पहिल्या पहिल्या मारून टाकण्याचा प्रयत्न होतो. नागाला कित्येकदा घराभोवती शेतामध्ये पहिले जाते, उंदीर आणि इतर कुर्तडनाऱ्या  प्राण्यान्मागे  तो येतो, अचानक अडवले असता अगोदर तो फना काढून धमकी देतो परंतु, त्यावर पाय ठेवल्यास किव्वा इजा केल्यास तो डसतो.
     नागाच्या विषावर इस्पिताल्न्मध्ये औषधे उपलब्ध आहेत. अनेक वेळा ग्रामीण भागा मध्ये उपचाराऐवजी  घराची घरीच आयुर्वेदिक पद्धती अवलम्बल्या मुळे मृत्यू होतो.

__________________________________________________________________________

नागराज King Cobra (Ophiophagus Hannah)


नागराज हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.


किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑस- साप ; फॅगी- खाणे) असे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नाग, अॅाडलर , आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतो. त्याची लांबी सु. ५.६ मीटर असते. भारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूर, कोइमतूर, निलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहे. दक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतो. त्याच्या नावात ‘नाग’ हे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाही. त्याचे प्रजातिनाम वेगळे आहे. नागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहे. एका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.
नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिकट पिवळे पांढरे , खवले मऊ एकसारखे असतात. लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटते. त्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणा. पूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासते. इतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येते. वरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतात. यामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येते. नर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतो. नागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.
ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहे. इतर नाग “नाजा” प्रजातिमधील आहेत. इतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतो. त्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसते. नागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटल) खवले. डोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.
इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असते. साप नेहमी जीभ बाहेर काढतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. दुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होते. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होते. या कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. एकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतो. त्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतो. दिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतो. त्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.
मानवी संपर्क नागराज सहसा टाळतो. पण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतो. शरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभाव. नागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (२५०० हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवमुळे नागराज चिडतो. नागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतो. त्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतो. आणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतो. एका वेळा तो अनेक चावे घेतो. प्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते. त्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाही. डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.
सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करते. नागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होते. या झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातो. नागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामण, लहान अजगर, सर्व विषारी साप असतात. साप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडे, पक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातो. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. एरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.
नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते. विष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असते. चावा घेताना विषाचे दात शरीरात १.२५ ते १.५० सेमी. घुसतात. विषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तीव्र, वेदना, चक्कर येणे, पक्षाघात, शक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. हृदयक्रिया बंद होणे , कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतो. नागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा १.६ मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहे. एका अभ्यासात चिनी नागराजाच्या ०.३४ मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहे. नागराज एका वेळी ३८०-६०० मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावते. सरासरी ३०-४५ मिनिटामध्ये मृत्यू ओढवतो. नागराजाने दंश केलेल्या ७५% व्यक्ती मरण पावतात. सध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेत. थायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.
नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतो. जंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी २०-४० अंडी घालते. अंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसते. जवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावते. पानांच्या घरात तापमान २८ अंश सें ठेवलेले असते. अंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खाते. आपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाही. अंड्यातून बाहेर पडलेली पिले ४५-५५ सेमी लांबीची असतात. त्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असते. पिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात.
_______________________________________________________________________________

मण्यार  Common Krait and Banded Krait  (bungarus caeruleus)


लांबी: पिलांची लांबी १०-११ इंच असते, तर प्रौढ साप ४ फुटा पेक्षा मोठा अस्तु, जास्तीत जास्त लांबी ५.५ फुट मोजली आहे.
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे[१]. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली व सरडे, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे
विष: मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो[. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

______________________________________________________________________________



घोणस Russell’s Viper (Daboia Russelli)

घोणस हा भारतातील एक Viper जातीचा साप आहे, तो उत्तर पूर्व भारत सोडून संपूर्ण देशात आधालातो. पहिल्यांदा पाहून तो अनेकांना अजगर असल्यासारखे वाटते. घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा आणि त्याचे बेडकासारख्के तोंड. घोणस हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात
घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.
घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.
विष: घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे.
____________________________________________________

चापडा  BAMBOO PIT VIPER (TRIMERESURUS GRAMINEUS)

चापडा किंवा हिरवा चापडा हा भारतातील सुद्धा एक Viper जातीचा साप आहे,  हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर राहतो. हा साप घोणस प्रमाणेच अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. हा साप प्रामुख्याने दक्षिण भारतात सापडतो, महाराष्ट्रातील कोकण, बोरिवली राष्ट्रीय उद्यान येथे सापडतो.

____________________________________________________
____________________________________________________

*बिनविषारी साप*:


अजगर Indian Rock Python (python molerus molerus)

अजगर हा भारतात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.
पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मी. पर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते.
हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना तो कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर  त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.
जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी ८ - १०० अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते.
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. म्हणूनच अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते.
फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.
_______________________________________________________

धामण Rat snake (Ptyas mucosus)



हा एक बिनविषारी साप असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस  आहे. सर्व भारतभर तो आढळतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी १,८३० मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर सापडतो.
हा दांडगा आणि भीती उत्पन्न करणारा साप आहे. याची लांबी २·२५ ते २·५० मी. किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असून घेर सु. १० सेंमी. असतो. शेपूट लांबीच्या एकचतुर्थांश असून टोकदार असते. डोके लांबट असून बारीक मानेपासून  स्पष्टपणे वेगळे असते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळया असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा (कनीनिका) सोनेरी असतो. नाकपुड्या मोठ्या असतात. पाठीचा रंग हिरवट किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीराच्या पुढील भागावरील खवले एकाच रंगाचे असतात; पण मागच्या बाजूला पुष्कळ खवल्यांच्या कडा काळ्या असतात. यामुळे पाठीवर जाळे असल्यासारखे दिसते. पाठीवरील काही खवल्यांवर बारीक कणा असतो. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पांढरट किंवा पिवळसर असते आणि गळ्याजवळ पिवळा रंग जास्त स्पष्ट असतो.
धामण सर्व प्रकारच्या परिस्थितींत आढळणारा नित्यातला साप आहे. घरांच्या जवळपास तो दिसतो. मनुष्यवस्तीत दिवसा तो एखाद्या सुरक्षित जागी लपून बसतो; पण वस्ती नसलेल्या ठिकाणी तो निर्भयपणे दिवसा हिंडत असतो. जुन्या पडीक भिंती, झाडेझुडपे, कुजणारा पालापाचोळा, भातशेते वगैरे ठिकाणी तो असतो. तो उत्तम पोहणारा असून झाडावर चढण्यात तरबेज आहे. पाण्याच्या जवळपास राहून तो बेडूक खातो. त्याचप्रमाणे झाडावर चढून पक्षी आणि त्यांची अंडी खातो. घुशी आणि उंदीर हे त्याचे नेहमीचे खाद्य आहे.
शक्यतोवर माणसाचे सान्निध्य तो टाळतो; पण त्याला कोंडीत पकडले, तर त्वेषाने हल्ला चढवायला तो कमी करीत नाही. हल्ला चढवताना शत्रूच्या तोंडावर नेम धरून तो प्रहार करतो व चावतो. पुष्कळ मोठा व भयंकर दिसणारा असला, तरी तो मुळीच विषारी नाही. हा चलाख असून याच्या सगळ्या हालचाली शीघ्र गतीने होत असतात.
या सापासंबंधी बऱ्याच समजुती प्रचलित आहेत : धामण हा ⇨ नागांचा नर आहे; गायीचे किंवा म्हशीचे आचळ तोंडात धरून तो सगळे दूध चोखून घेतो, नंतर आचळाला दंश करून तिला ठार करतो किंवा आपले शेपूट गायीच्या किंवा म्हशीच्या नाकात खुपसतो आणि नंतर ते जोराने बाहेर काढून तिला मारतो; चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसाला चावला, तर तो आंधळा होतो इत्यादी. या सगळया समजुती चुकीच्या आहेत.
हा अंडी घालणारा साप असून पिल्ले पावसाळयात अंडी फोडून बाहेर पडतात. धामण ज्या टायास  वंशातली आहे त्याच वंशाच्या पट्टेरी धामण (टायास फॅसिओलेटस) व वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती भारतात आढळतात.
_________________________________________________________________

तस्कर Common Trinket Snake (Elaphe helena)

   तस्कर जम्मू काश्मीर आणि उत्तर-पूर्व भारत सोडून संपूर्ण भारतात सापडतो. (शास्त्रीय नावःElaphe helena) हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात.
 हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत
  छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडुक इत्यादी हा साप खातो.
_____________________________________________________________________________

गवत्या ( Green Keel back )


‘गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो.
गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा ( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही.
बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात.
गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात.

_____________________________________________________________________________



वाळा (Ramphotyphlops braminus)

वाळा हा भारतात  सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो.

 वाळा साप लालसर लपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.
 महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते. गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.
 वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.
 वाळा मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या खातो. वाळ्यांमध्ये अंड्यांद्वारे प्रजनन होते. सर्वसाधारणतः ३-७ तांदळाच्या आकाराची अंडी घातली जातात.
___________________________________________________________________


हरणटोळ (Green Vine Snake)


हरणटोळ हा भारतात जंगलांमध्ये सापडतो. हा साप हा पूर्ण पाने झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किव्वा फांद्यांवर दिसून येतो, जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो,
हरणटोळ हा केवळ एकाच हिरव्या रंगात सापडत नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अश्या मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो, त्यची जीभ हि लांब आणि गडद हिरव्या रंगाची असते जीने तो आजूबाजूच्या स्तिथी चा अंदाज घेत असतो. घाबरला असता तो स्वताला फुगवून मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो.
एका वयस्क हरणटोळ चा घेर २ सेमी असून लांबी २ मीटर पर्यंत वाधू शकते. तो आपल्या लांब शेपटी चा वापर झाडावर चडताना किव्वा शिकार करताना माकडा सारख्या फांद्यांना पकडायला वापरतो. दुसऱ्या सापांपेक्षा याचे डोके लांब असते, डोक्याच्या टोकाला तोंड आणि नाक असते.
हरणटोळ हा एक धीम्या गतीचा साप असून तो स्वताला वाचवण्यासाठी पूर्णपणे आपल्या त्वचेच्या रंगाच्या झाडांमध्ये गायब होण्याच्या सवयीवर अवलंबून असतो. हरणटोळ हा पाली. सरडे. बेडूक आणि इतर कुर्ताडणाऱ्या प्राण्यांना खातो. तो आपल्या भक्ष डसून त्यामध्ये विष सोडून त्याला अक्क्खा गिळून खातो.
हरणटोळ हा माध्यम विषारी साप आहे, जरी त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून लहान मुलगा आजारी पडू शकतो तर मोठ्यांना माधुमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होते. आजपर्यंत याच्या चावण्याने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाला नाही आहे.
आजकाल हरणटोळ हा अनेक ठिकाणी पेट म्हणून ठेवण्यात येत आहे, जरी स्वभावाने शांत असला तरी कधी कधी चिडून तो चावा घेतो, त्याच्या जबड्याच्या मागील दातांमध्ये विष असते. बाजारात सुद्धा त्यची विक्री होण वाढलेलं आहे, त्वचेच्या रंगामुळे लोकांच्या पसंतीस आल्यामुळे घरात पाळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचे दुष्परिणाम मात्र सापाच्या जंगलातील संख्येवर आणि बंदिस्त अवस्थेत त्याच मरण्यात होत आहे.
_______________________________________________________________________
डुर्क्या घोणस (gonglyophis conicus)

हा एक साप असून त्याला कांडर असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून ⇨ अजगराचा नातेवाईक आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स वंशात जरी एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात.


डुर्क्या घोणस भारतात सगळीकडे आढळतो. रेताड मातीत राहणे याला विशेष मानवते. जमिनीत विशेष खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा वाळवंटात राहणारा साप आहे असे काहींचे म्हणणे आहे, पण मैदानी प्रदेशात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फार पाऊस पडतो आणि दाट जंगल असते अशा डोंगरातही (उदा., पश्चिम घाटात) तो आढळतो.


याची लांबी ३०-७५ सेंमी. असून शरीर जाड असते; शेपूट अतिशय आखूड, एकदम निमुळते झालेले आणि फक्त २५-४० मिमी. लांब असते, त्याला टोक असते. पाठीचा रंग करडा असतो किंवा त्यात गुलाबी छटा दिसते; पाठीकवर पिवळसर तपकिरी किंवा गर्द तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. काही नमुन्यांचा रंग काळसर असून पाठीवर करडया रगाचे विषयम आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. मुस्कट पुढे आलेले असून त्याचा उपयोग जमिनीत बिळे करण्याकरिता होतो. डोळे फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुडया चिरेसारख्या असतात.


डुर्क्या घोणस विद्रूप आणि अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळया हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक वगैरे खाऊन तो आपली उपजीविका करतो. भक्ष्याभोवती शरीराचा विळखा घालून तो घट्ट आवळून त्याला मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.


या सापाच्या वर्णनात काही ठिकाणी `हा साप अंडज असून मादी उन्हाळयात अंडी घालते' असे आणि याच्या उलट काही ठिकाणी, `हा साप अंडी घालीत नाही मादीच्या पोटातून जिवंतच पिल्ले बाहेर पडतात, असेही म्हटलेले आढळते. दुसरे विधान खरे असावे असे दिसते.
_________________________________________________________________________


कुकरी (oligodon arnensis)


या सापांचा कोल्युब्रिडी सर्पकुलात समावेश होतो. यांच्या एकूण ४० जातींपैकी सु. १३ भारतातील आहेत. यांतील काही जाती भारतात सर्वत्र सापडतात आणि बाकीच्या निरनिराळ्या भागांतच दिसून येतात.

हे बिनविषारी साप लहान असून त्यांची लांबी ३० – ६० सेंमी. असते. इतर सापांच्या मानाने यांना थोडे दात असतात. वरच्या जबड्यातील मागचे काही दात गुरख्यांच्या कुकरीच्या आकाराचे असल्यामुळे यांना ‘कुकरी’ साप म्हणतात. हे चपळ असून भित्रे नसतात. सरडे, पाली व त्यांची अंडी यांवर ते उदरनिर्वाह करतात.

भारतात सगळीकडे आढळणारी सामान्य जात ऑलिगोडॉन आर्नेन्सिस  ही आहे. ही महाराष्ट्रात पुष्कळ सापडते. शरीर तपकिरी असून त्यावर २०—६० काळे आडवे पट्टे असतात; त्यांपैकी ६—१२ शेपटीवर असतात. पोट पांढरे असते. डोक्यावर ^ च्या (उलट्या रोमन व्ही अक्षराच्या) आकाराच्या लागोपाठ तीन खुणा असतात म्हणून या सापाला ‘त्रिशर’ म्हणतात.

हा नेहमी आढळणारा साप असला तरी पावसाळ्यात वारंवार दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो. तो सपाट प्रदेशात असतो पण सु. १, ६७५ मी. उंचीवरही आढळलेला आहे. याला डिवचल्यावर चिडून तो आपले सगळे शरीर खूप फुगवतो. मादी अंडी घालते. ऑलिगोडॉन  वंशातील आणखी एकदोन जाती महाराष्ट्रात आढळतात.  *बापूसाहेब सोनवणे* FONA

Thursday, 7 July 2016

पावसाळ्यातील आजार

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁          .पावसाळ्यातील आजार
                   Aro
पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याची समस्या उद्भवते आणि त्यामुळेच अतिसारासारख्या रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. अतिसाराच्या लक्षणांमध्ये पुढील बाबींचा समावेश असतो. नॉशिया, उलट्या होणं आणि वारंवार शौचाला पातळ होणं.
उपाय
अतिसारावर करावयाचा घरगुती उपाय म्हणजे ओआरएस पॅक देणं किंवा मीठ, साखर घालून पाणी देणं. रुग्णाच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर टोस्ट, सफरचंद, केळ, शिजलेला भात, लॅक्टोबॅसिलस युक्त दही यांचा समावेश असावा. जर दोन दिवसात काही सुधारणा झाली नाही तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. विशेषतः जर द्रवपदार्थही पिणं शक्य नसेल आणि तर पावसाळ्यात बदलत्या ऋतूमानामुळे होणाऱ्या आजारात भर पडत असून विशेषतः साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची पैदास होण्याचे प्रमाण वाढते. पाणी साठलेल्या ठिकाणी डासांची अंडी अधिक प्रमाणात वाढतात.
मलेरियाची लक्षणं
l पोटात दुखणं, थंडी वाजणं आणि घाम येणं, अतिसार, नॉशिया आणि उलट्या, ताप चढणं, स्नायू दुखणं आणि चक्कर येणं.
मलेरिया होऊ नये याकरता
कोणती काळजी घ्यावी
l लांब हाताचे कपडे घाला, डासांना प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणी तसंच औषधांचा उपयोग करा. पाणी साठून राहाणार नाही याची काळजी घ्या. जर दोन दिवसांपासून एखाद्या व्यक्तीला बराच ताप चढत असेल तर रुग्णाला डॉक्टरांकडे न्या.
डेंग्यूची लक्षणं - अचानकपणे खूप ताप येणं, तीव्र डोकेदुखी, डोळ्यामागे दुखणं, सांधे आणि स्नायू खूप दुखणे, नॉशिया, उलट्या, त्वचेवर ऍलर्जी उठणं, ताप आल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ती दिसून येतात
उंदराच्या मूत्रविसर्जनातून हा जीवाणू गढूळ पाण्यात शिरतो. या पाण्यातून चालताना पायाला झालेल्या जखमा व छोट्या चिरांमधून जंतुसंसर्ग होतो. ताप येणं, डोळे लाल होणं, यकृतदाह, कावीळ व मूत्रपिंडाच्या कामात बाधा येणं ही त्याची लक्षणं. प्रत्येक वेळी मुलांना घराबाहेर पाठवताना गमबूट घालणं शक्य नाही. त्यामुळे गढूळ पाण्यात मुलांना खेळू न देणं तसंच घरी आल्यावर पाय स्वच्छ धुणं आणि पायांवरील छोट्या-मोठ्या जखमांवर त्वरित औषधोपचार करणं हा लेप्टोच्या प्रतिबंधाचा सोपा उपाय आहे.
मलेरिया, डेंग्यू - मलेरियामध्ये दर एक दिवसाआड थंडी भरून ताप येतो. पण लहान मुलांमध्ये उलट्या, जुलाब, रोज एकदा किंवा दोनदा ताप येणं अशा लक्षणांमुळे निदानात संदिग्धता निर्माण होते. डेंग्यूचा विषाणू एडिस नावाच्या डासामार्फत होतो. तीव्र ताप, हात-पाय मोडून येणं आणि अंगावर विशिष्ट प्रकारचे पुरळ येणं ही या आजाराची लक्षणं. विषाणूंमुळे होत असल्याने हा आजारही स्वनियंत्रित असतो, मात्र अनेकदा गुंतागुंत होण्याची शक्यता ताप उतरताना असते. म्हणून डॉक्टरमंडळी एकापेक्षा अधिक वेळा रक्तचाचणीचा सल्ला देतात. या दोन्ही आजारांवर प्रतिबंधक लस नाही. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची वाढ होत असल्याने पाणी साठू न देणं हा चांगला उपाय. याशिवाय कीटकनाशक औषधांची फवारणी आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी मॉस्किटो रिपेलन्ट क्रीम, मच्छरदाणी असे उपाय करावेत. मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. लेप्टोस्पायरोसिस हा आजार स्पायरोकेंट या जीवाणूमुळे होतो.
आजाराच्या पहिल्या टप्प्यातील लक्षणं ही सामान्य स्वरुपाची असतात नंतर ती तीव्र स्वरुपाची होतात. हा ताप पाच ते सात दिवस राहिला तर रक्तचाचणीद्वारे याचे निदान केलं जातं. मात्र योग्य उपचारानंतरही तब्येत सुधारायला वेळ लागतो. महिनाभर खाण्यापिण्याचे पथ्य पाळली तर कावीळ, मलेरिया पुन्हा उद्भवत नाही..........🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
bapusahebsonawane.blogspot.com 🙏      धन्यवाद.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, 19 June 2016

मुंगीखाऊ ANTLION

भोवर्‍यातील भक्षक   ANTLION

---
वाईल्डलाईफ हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या डोक्यात वाघ, सिंह, हरीण वगैरे मोठे प्राणीच फ्लॅश होतात. कदाचीत त्याच्या अद्धुतरम्य दर्शनामुळेच अनेकांचा वाईल्डलाईफबद्दलचा दृष्टीकोन अशा 'ग्रेटर फाऊना' पुरताच मर्यादीत राहतो. पण खरं सांगायचं, तर आपल्या घरातले झुरळ, मधमाशा, डास हे कीटकसुद्धा वाईल्डच आहेत. आयुष्यात हस्तक्षेप करून माणसाने आपल्या फायद्यासाठी हवे तसे मोल्ड केलेले प्राणी सोडले तर इतर यच्चयावत सृष्टी वाईल्ड आहे आणि राहील. असाच कायम वाईल्ड राहणार्या कीटकांपैकीच एक म्हणजे मुंगीखाऊ अँट लायन.
ज्यांनी उन्हाळ्यात मोकळ्या मैदानात चक्कर मारलीय, त्यांनी या फोटोत दिसतोय तसे अनेक भोवरे वाळूत पाहिले असतील. हे भोवरे म्हणजेच अँटलायनच्या निम्फचे म्हणजे पिल्लाचे मुंगी वगैरे किटक पकडण्यासाठी बनवलेले सापळे असतात.
जगातल्या बर्याचशा कीटकांची जीवनपद्धत 'अंड, अळी, कोष आणि प्रौढ' या चक्रातून फिरत असते. या प्रोसेसला मेटामॉर्फोसिस म्हणतात. यातल्या प्रत्येक टप्प्यावर पुढच्या टप्प्याला चालना देणारे महत्वाचे बदल घडत असतात. अँटलायनसुद्धा याच चक्रातून जातो. अँटलायनची मादी वाळूत अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेला निम्फ आपल्या पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक असणार्या म्हणजे खादाडीच्या तयारीला लागतो. त्यासाठी तो मऊ वाळू असलेली जागा निवडतो. मुंग्यांची रेलचेल असणारी जागाच सहसा निवडली जाते. मनपसंद जागा मिळाल्यावर तो उलटा गोल गोल चालत वाळूमधे साधारण तीन सेंटीमीटर खोलीचा आणि पाच सेंटीमीटर रूंदीचा खड्डा तयार करून खड्याच्या तळाशी दबा धरून मुंगीची वाट बघत असतो. 'किती बाई अजून काम शिल्लक आहे' असा विचार करत आपल्याच नादात चालणारी एखादी मुंगी, 'हल्ली बोअर मधे मुलं पडतात' तशी धपकन त्या खड्यात पडते. खड्यात पडल्यावर ती वर येण्याची धडपड करू लागते. पण निम्फने त्याच्या कौशल्याने त्या खड्याच्या भिंती इतक्या गुळगुळीत करून ठेवलेल्या असतात की मुंगी जितका वर चढायचा प्रयत्न करेल तितकी तिच्या पायाखालची वाळू सरकत राहते आणि शेवटी मुंगी तळाशीच पोहोचते. अँटलायनच्या तोंडात असलेल्या चिमट्यांवर सुक्ष्म केस असतात. वाळूत झालेली हालचाल ते झटकन सेंस करतात आणि अँटलायन क्षणार्धात बाहेर येऊन मुंगीची गचांडी धरतो. मुंगी निसटून बाहेर पडायची धडपड करू लागली तर तो तोंडाने तिच्यावर वाळू उडवून तिला परत आत पाडतो आणि त्याच्या तोंडात असलेले पाचक रस मुंगीच्या शरीरात टोचून तो त्याला हवे ते जीवनरस शोषून घेतो. मग तिचे 'दहावा-बारावा' वगैरे वाळूच्या तळघरातच पार पडतात.
कोषावस्था गाठण्यासाठी त्याला अशा अनेक मुंग्या पचवाव्या लागतात आणि आवश्यक ती उर्जा जमा होईपर्यंत तो मुंग्या खात राहतो. त्याची ही अवस्था तीन वर्षसुद्धा टिकू शकते. या काळात तो 'शी' करत नाही. उलट शरीरातल्या जमा झालेल्या वेस्टपासून तो कोषाच्या अवस्थेत जाण्यासाठी सिल्क तयार करतो. कोषातून बाहेर पडलेल्या अॅडल्टचं आयुष्य मात्र जेमतेम काही दिवसांचच असतं. अनेकांना प्रश्न पडेल की इतकं कमी आयुष्य असेल तर मग अळीचं आयुष्य एवढं मोठं का? तर त्याचं उत्तर आहे, निसर्गाने प्रत्येकाला आपलं काम नेमून दिलेलं आहे. मुंग्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणार्या अनेक घटकांपैकी अँटलायन एक आहे. त्याचं ते काम झाल्यावर तो पुढच्या टप्प्यात जातो.
पण यातून एक गोष्ट मला तरी शिकण्यासाठी आढळली. ती म्हणजे, 'तुम्ही लहान आहात, दुर्लक्षित आहात, कुरूप आहात, तरी आपलं काम थांबवायचं नाही. नेमून दिलेलं काम नेमस्तपणे यथायोग्य पार पाडायचं.
माझी खात्री आहे, भगवान श्रीकृष्णांचा 'नियतं कुरू कर्मः' हा संदेश या कीटकाशिवाय फारच कमी मनुष्यगणांना कळला असेल.
---

Other schools blog

Monday, 2 May 2016

हाइड्रोफ़ीनाए (समुद्री सर्प) Hydrophiinae (sea snakes)

हाइड्रोफ़ीनाए (समुद्री सर्प)
Hydrophiinae (sea snakes)

समुद्री सर्प
वैज्ञानिक वर्गीकरण
जगत: जंतु
संघ: रज्जुकी (Chordata)
वर्ग: सरीसृप (Reptilia)
सुपरऑर्डर: लेपिडोसोरिया (Lepidosauria)
गण: स्क्वमाटा (Squamata)
उपगण: सर्प (Serpentes)
कुल: इलापिडाए (Elapidae)
उपकुल: हाइड्रोफ़ीनाए (Hydrophiinae)
स्मिथ, १९२६
हाइड्रोफ़ीनाए (Hydrophiinae), जिन्हें समुद्री सर्प (sea snakes) भी कहते हैं, इलापिडाए सर्प कुल की एक उपशाखा है जिसके सदस्य विषैले और अपना अधिकांश जीवन समुद्र व अन्य जलीय स्थानों पर व्यतीत करने वाले होते हैं। इन में से ज़्यादातर का शरीर समुद्री जीवन के अनुकूल होता है और वे धरती पर अधिक समय नहीं रह पाते हालांकि लातिकाउडा (Laticauda) वंश के सर्प कुछ हद तक धरती पर चलने में सक्षम हैं। इनकी पूँछ का अंतिम भाग चपटा होता है, जो उन्हें तैरने में सहायक होता है। समुद्री सर्प हिन्द महासागर से लेकर प्रशांत महासागर के गरम जलीय क्षेत्रों में पाये जाते हैं। आनुवंशिकी (जेनेटिक) दृष्टि से समुद्री साँप औस्ट्रेलिया के विषैले सर्पों से सम्बन्धित हैं।[1]

विष

समुद्री सर्पों का ज़हर बहुत ही ख़तरनाक होता है, और कुछ का विष नाग के विष से १००० गुना अधिक पाया गया है। फिर भी समुद्री सर्पों के काटने से बहुत ही कम लोगों की जाने जाती हैं।[2] इसका पहला कारण है कि अधिकतर समुद्री सर्प शर्मीले स्वभाव के होते हैं। अगर उनका मनुष्य से सामना हो तो वे लगभग हमेशा ही भागने की चेष्टा करते हैं। यदी वे ग़लती से पकड़ में भी आ जाये तो भी छोड़े जाने पर उनकी कोशिश अक्सर भाग निकलने की ही होती है। दूसरा कारण है कि उनका मुँह अधिकतर बहुत छोटा होता है। यह मछलियों को काटने के लिये तो पर्याप्त है लेकिन मानवों को काटना उनके लिये कठिन होता है। अक्सर अगर वे काट भी लें तो विष का प्रवाह नहीं करते। फिर भी उनके विष के कारण वैज्ञानिक यह सलाह देते हैं कि समुद्री सर्पों के साथ बहुत ही सावधानी बर्ती जाये।[3] कुछ समुद्री सर्प ऐसे भी हैं जो क्रोधित होकर डसने की कोशिश करें।

श्वास

सभी सरीसृपों (रेप्टाइलों) की तरह समुद्री सर्पों के भी फेफड़े होते हैं और उन्हें साँस लेने के लिये समुद्र की सतह पर आना पड़ता है। लेकिन उनके फेफड़े उनके शरीरों के हिसाब से बहुत बड़े होते हैं और वे एक से दो घंटों के लिये साँस रोक सकते हैं। कुछ तो साँस भरकर समुद्र के फ़र्श पर जाकर सो भी जाते हैं। कई समुद्री सर्पों में कुछ हद तक अपनी त्वचा से पानी में घुले हुए आक्सीजन को खीचने की क्षमता होती है जो उन्हें अधिक देर तक श्वास रोकने देती है

मण्यार (विषारी साप

)मराठी नाव- मण्यार (विषारी)
हिंदी नाव- सामान्य कैरत (विषैला)
इंग्रजी नाव- Common Krait (Venomous)
आंतरराष्ट्रीय नाव- Bungarus caeruleus

स्थानिक नावे (Local name)- चंद्र कांडर (द कोकण), काणेर (गोवा), चूड (पालघर), नरकाकल्ले (गडचिरोली), दांड्या काडीचा (चंद्रपुर).

शास्त्रीय वर्गीकरण (Scientific classification)-
Kingdom (वंश) - Animalia
Phylum (संघ) - Chordata
Subphylum (उपसंघ) - Vertebrata
Class (जात) - Reptilia
Order (वर्ग) - Squamata
Suborder (उपवर्ग) - Serpentes
Family (कूळ) - Elapidae
Genus (जातकूळी) - Bungarus
Species (जीव) - B. caeruleus.

रंग व आकार (Identification)- ह्याचा रंग काळसर निळा किंवा गडद तपकारी. त्यावर आडव्या पांढऱ्या पट्ट्यांच्या जोड्या. पट्टया डोक्याकडे फिकट तर शेपटिकडे गडद. डोक्यावरील भाग पूर्ण काळा. ओठ व पोटाकडिल भाग पूर्ण पांढरा, मऊ खवले. पाटिवरचे मधल्या रांगेतील खवले षटकोनी आणि मोठे. दंडगोलाकार शरीर. आखूड शेपूट. जीभ गुलाबी लाल असते.

लांबी (Maximum length)- ९३ ते १७२ सेमी (३.३ ते ५.९ फूट).

प्रजनन (Breeding Behavior)- मार्च ते मे दरम्यान मादी ८-१२ अंडी घालते. साठ दिवसाच्या कालावधीनंतर अंड्यातून पिले बाहेर येतात.

पिलांची लांबी (New born)- २५-२८ सेमी.

खाद्य (Food)- इतर साप, क्वचित प्रसंगी टोड, उंदीर, पाली, सरडे व बेडूक इ.

आढळ (Distribution)- भारतात सर्वत्र. पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका.

निसर्ग निवास (Habitat)- दिवसा वारुळे, उंदराची बिळे, दगड वीटांच्या ढिगाऱ्यात विश्रांति घेतो. बरेचदा शेतात, बागेत तसेच पाणथळ जागीहि आढळतो.

वैशिष्टे (Characteristics)- निशाचर. लाजाळु. मण्यार ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात. मण्यारच्या भारतात आढळणाऱ्या अन्य जाती- १)Bungarus sindanus walli, २)Bungarus fasciatus, ३)Bungarus andamanensis, ४)Bungarus nigar.

विषाचा प्रकार (Type of Venom)- न्युरोटॉक्सिक (Neurotoxic).

दंशाची लक्षणे- मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच Neurotoxic असते. व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषापेक्षा खूप जहाल असते. बरीचशी लक्षणे नागाच्या दंशाप्रमाणे असतात. फक्त दंश झालेल्या जागेवर जळजळ होत नाही किंवा सूज येत नाही. काही वेळाने पोटात आणि सांध्यात अतिशय वेदना होऊ लागतात. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. काही काळाने मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

उपचार- मण्यार चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे.
१)जखम स्वच्छ धुवावी.
२)रुंद क्रेप बँडेज दंश झालेल्या भागापासुन काही अंतर सोडून पुर्ण अवयवास बांधावे. बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. त्यासाठी बँडेज बांधताना फळीचा आधार घ्यावा. घोणस वा फूरसे चावले असल्यास बँडेज बांधू नये.
३)सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकद्रुष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्यास धीर द्यावा. व उबदार ठेवावे पण त्यासाठी अल्कोहल पाजू नये. चालणे, बोलणे असे कोणतेही श्रम करु न देता त्यास शांत राहण्यास सांगावे.
४)डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा, मधुमेह, रक्तदाब अथवा कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास प्रथम सांगावे. प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन(ASV) देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल मण्यारच्याच विषापासून बनवलेले असते.

स्केल (Scalation)- Head: 7 supralabials; 3rd & 4th in contact with eyes; 1 preocular touches posterior nasal hence loreal absent; 2 postocular; temporals 1+2.
Dorsal: Smooth scales in 15 rows throughout. 8th scale which is on the top of the dorsal body along the vertebra is larger than adjacent dorsal scales and of hexagonal shape.
Ventral: 200-217 (234); anal undivided (entire).
Sub Caudal: 33-52 and undivided.

फुरसे (शास्त्रीय नाव : Echis, उच्चार: एकिस; इंग्लिश: Saw-scaled viper) विषारी साप

फुरसे

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरिसृप
कुळ: वायपरिडी
(Viperidae)
उपकुळ: वायपरिनी
(Viperinae)
जातकुळी: एकिस (Echis)
जीव: एकिस कॅरिनेटस
(Echis Carinatus)
शास्त्रीय नाव
एकिस कॅरिनेटस
(श्नायडर, १८०१)
फुरसे (शास्त्रीय नाव : Echis, उच्चार: एकिस; इंग्लिश: Saw-scaled viper) हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत आहे.[१] २००९ साली इराक मध्ये त्तैग्रीस आणि युफ्रायटिस नद्यांच्या खोर्‍यांत दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरशांनी इराकी जनतेमध्ये दहशत पसरवली होती.[२][३]

वर्णन

फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढर्‍या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ती बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेली असतात. डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी (­↑) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते.[४]

डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात.

आढळ

फुरसे भारतात जवळजवळ सगळीकडे आढळते. मैदानी प्रदेशात जरी तो बहुधा राहत असला, तरी १,८०० मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलात मात्र तो नसतो. हा साप अनेकदा दगडांच्या खाली आढळतो. कडक उन्हाचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो.[४]

स्वभाव

हे साप संधिप्रकाशात (पहाटे आणि संध्याकाळी) किंवा रात्री सक्रिय असतात. तरीही ते दिवसासुद्धा सक्रिय असल्याचे काही अहवाल सांगतात.[५] दिवसा ते प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा, कपारी, सडलेले लाकडाचे ओंडके अशा अनेक ठिकाणी लपून बसतात. वाळूमय वातावरणात ते स्वतःचे शरीर वाळूत पुरून फक्त तोंड उघडे ठेवू शकतात. ते साधारणपणे पावसानंतर किंवा दमट रात्री जास्त सक्रिय असतात.[९]

फुरसे हा साप आक्रमक असतो. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविले, तर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासतो. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून तो झटकन डोके पुढे काढतो आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेतो. या सर्व क्रिया फक्त १/३ सेकंदात होतात.[२] हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.[४]

अन्न

हा साप बेडूक, सरडे, पाली, लहान साप, विंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो.[४]

प्रजनन

हा साप अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. उत्तर भारतातील सापांचे मिलन हिवाळ्यात होते व मादा एप्रिल ते ऑगस्टदरम्यान पिल्लांना जन्म देतात. मादा एका वेळी ३ ते १५ पिल्लांना जन्म देते. पिल्लांची लांबी ११५ ते १५२ मिमी असते.[६]

विष

या प्रजातीचे साप सरासरी १८ मिग्रॅ कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे १५ ते २० मिग्रॅ विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त ५ मिग्रॅ डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते, नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो.[२]

हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२०% माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बर्‍याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.[४] याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहेअसल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहे.

तस्कर - Common Trinket Snake- Coelognathus helena helena

स्थानिक नावे - तिडक्या  (वर्धा ), सडाण (गोवा ),सोंगट्या (नाशिक )

सरासरी लांबी - ७० से.मी ( २ फूट ४ इंच)

अधिकतम लांबी-  १६८ से.मी (५ फूट ६ इंच )

रंग व  आकार - तपकिरी किंवा शेवाळी अंगावर फिकट आडवे पट्टे. सडपातळ शरिरावर चमकदार खवले. मानेवर दोन गडद तपकिरी किंवा काळ्या रेषा. डोके टोकदार, डोळे मोठे व  बाहुल्या. डोळ्यांमध्ये काळी रेष.

प्रजनन - मार्च  - मे दरम्यान मादी ७ - १५ अंडी घालते. सुमारे ६५ दिवसांनी पीले बाहेर येतात. पिलांची लांबी साधारण २० - २५ से.मी.

खाद्य - उंदीर, पाली, छोटी पक्षी व त्यांची अंडी

आढळ - भारतात सर्वत्र

वास्तव्य - खुरट्या  झुडपांचा प्रदेश, खडकाळ प्रदेश, खेडी, नागरी वस्ती  तसेच जंगले.
विशेषतः जमिनीवर पण भक्ष्याच्या शोधात झाडावरही चढ़तो

वैशिष्टे - दिनचर व निशाचर. शरीरावरील नक्षी वाकी या दागिन्यासारखी असते.

कवड्या Wolf snake (lycodon aulicus) बिनविषारी साप

कवड्या  Wolf snake (lycodon aulicus)

या बिनविषारी सापाचा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या कोल्युब्रिनी या उपकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव लायकोडॉन ऑलिक्स आहे. हा भारतात आणि श्रीलंकेमध्ये सगळीकडे आढळतो; शिवाय अंदमान, मलाया, इंडोचायना आणि फिलिपीन्स बेटांतही तो सापडतो. सपाट प्रदेशांत तो सगळीकडे आढळत असला तरी ६१० मी. पेक्षा जास्त उंचीवर सापडत नाही.
घराभोवतालच्या आवारात किंवा बागेत, खुद्द घरात व गुरांच्या गोठ्यात तो पुष्कळदा दृष्टीस पडतो; बाजार वगैरे दाट वस्तीच्या जागीही तो आढळतो. हा साप रात्रिंचर असल्यामुळे दिवसा एखाद्या आडोशाच्या जागी - पडीक भिंतीतल्या भेगा, दगड आणि विटा यांचे ढीग, गोठ्यातील चाऱ्याचे ढिगारे, जमिनीतली बिळे इत्यादींमध्ये-लपून बसतो आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. उंदीर, सरडे, पाली इत्यादींवर हा आपली उपजीविका करतो.

 याची लांबी सु. ६०-७५ सेंमी असते. शरीर सडपातळ आणि किंचित चपटे असून शेपूट निमुळते व काहीसे आखूड असते. नमुनेदार कवड्या सापाचा रंग तपकिरी-फिक्कट तपकिरी रंगापासून तो गर्द तपकिरी रंगापर्यंत असतो. क्वचित काळ्या रंगाचा एखादा साप आढळतो. पाठीवर पांढुरक्या किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. मानेभोवती याच रंगाचे वलय असते. आडवे पट्टे डोक्याजवळ सुरू होतात; पुढच्या भागात ते अगदी स्पष्ट असतात, पण मागच्या बाजूकडे क्रमाक्रमाने अस्पष्ट होत जाऊन शेपटीच्या टोकाकडे ते पूर्णपणे नाहीसे होतात. बहुतेक नमुन्यांत पट्ट्यांची संख्या ९ ते १८ असते; कधीकधी ही संख्या यांपेक्षाही कमी असू शकते, पण अजिबात पट्टे नाहीत असे सहसा होत नाही. पोटाचा रंग पांढरा किंवा किंचित पिवळसर असतो.
खालच्या व वरच्या जबड्यांवरील पुढचे दात बरेच मोठे असतात. वरचा ओठ पांढरा किंवा त्यावर तपकिरी ठिपके असतात; डोळे काळेभोर आणि बाहुली उभी असते.
हा अतिशय चपळ असून झाडांवर व इतर उंच ठिकाणी सहज चढून जातो. हा साप माणसाच्या दृष्टीस पडल्यास बहुधा निसटून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अडथळा केला किंवा पकडण्याचा प्रयत्न केला, तर तो उग्र स्वरूप धारण करून अत्यंत धीटपणे प्रहार करतो व कडकडून चावतो. पण हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याचा दंश घातक नसतो.
या सापाची मादी फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत केव्हातरी अंडी घालते. एका खेपेला घातलेल्या अंड्यांची संख्या ४ ते ७ असते. अंड्यांतून बाहेर पडणारी पिल्ले १५-१८ सेंमी. लांब असून रंग, शरीरावरील पट्टे इ. बाबतींत हुबेहूब प्रौढांसारखी असतात.

काही लोक या सापाला चुकीने ⇨मण्यार समजतात; पण मण्यारीचे पट्टे डोक्याच्या मागे काही अंतरावर सुरू होतात आणि ते शरीराच्या मागच्या भागात ठळक असून शेपटीच्या टोकापर्यंत असतात. शिवाय कवड्या सापाच्या गुदद्वाराचा खवला आणि शेपटीच्या खालचे खवले दुभागलेले असतात, पण मण्यारीत ते सबंध असतात.

इंग्लिश पेंटेड स्टॉर्क (Painted Stork)चित्रबलाक

शास्त्रीय नाव
(Mycteria leucocephala)
कुळ बलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश पेंटेड स्टॉर्क
(Painted Stork)
संस्कृत काचाक्ष, पिंगलाक्ष
हिंदी कठसारंग, जंघिल
चित्रबलाक, चाम ढोक किंवा रंगीत करकोचा हा करकोचा जातीचा पक्षी असून दिसायला सुंदर आहे. हा पक्षी आकाराने साधारणपणे गिधाडाच्या आकाराचा असून पाणथळी जागेत आढळतो. सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते.

चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.

दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो.

चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर बगळे आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते. मादी चित्रबलाक फिकट पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ५ अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात.

पूर्व विदर्भात स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात                     
  चाकण-करकोचा पक्षाचे युवकांनी वाचविले प्राण
https://www.youtube.com/watch?v=2Kv_EDQF264&feature=youtube_gdata_player

गवत्या (Green Keel back ) बिनविषारी साप

गवत्या (Green Keel back )
‘गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो.
गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा
( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही.
बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात.
गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात

डुरक्या घोणस बिनविषारी साप

डुरक्या घोणस (gonglyophis conicus)
हा एक साप असून त्याला कांडर असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून ⇨ अजगराचा नातेवाईक आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स वंशात जरी एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात.
 डुरक्या घोणस भारतात सगळीकडे आढळतो. रेताड मातीत राहणे याला विशेष मानवते. जमिनीत विशेष खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा वाळवंटात राहणारा साप आहे असे काहींचे म्हणणे आहे, पण मैदानी प्रदेशात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फार पाऊस पडतो आणि दाट जंगल असते अशा डोंगरातही (उदा., पश्चिम घाटात) तो आढळतो.
 याची लांबी ३०-७५ सेंमी. असून शरीर जाड असते; शेपूट अतिशय आखूड, एकदम निमुळते झालेले आणि फक्त २५-४० मिमी. लांब असते, त्याला टोक असते. पाठीचा रंग करडा असतो किंवा त्यात गुलाबी छटा दिसते; पाठीकवर पिवळसर तपकिरी किंवा गर्द तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. काही नमुन्यांचा रंग काळसर असून पाठीवर करडया रगाचे विषयम आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. मुस्कट पुढे आलेले असून त्याचा उपयोग जमिनीत बिळे करण्याकरिता होतो. डोळे फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुडया चिरेसारख्या असतात.
डुर्क्या घोणस विद्रूप आणि अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळया हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक वगैरे खाऊन तो आपली उपजीविका करतो. भक्ष्याभोवती शरीराचा विळखा घालून तो घट्ट आवळून त्याला मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.
या सापाच्या वर्णनात काही ठिकाणी `हा साप अंडज असून मादी उन्हाळयात अंडी घालते' असे आणि याच्या उलट काही ठिकाणी, `हा साप अंडी घालीत नाही मादीच्या पोटातून जिवंतच पिल्ले बाहेर पडतात, असेही म्हटलेले आढळते. दुसरे विधान खरे असावे असे दिसते.

हरणटोळ बिनविषारी साप

हरणटोळ (Green Vine Snake)
हरणटोळ हा भारतात जंगलांमध्ये सापडतो. हा साप हा पूर्ण पाने झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किव्वा फांद्यांवर दिसून येतो, जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो,
हरणटोळ हा केवळ एकाच हिरव्या रंगात सापडत नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अश्या मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो, त्यची जीभ हि लांब आणि गडद हिरव्या रंगाची असते जीने तो आजूबाजूच्या स्तिथी चा अंदाज घेत असतो. घाबरला असता तो स्वताला फुगवून मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो.
एका वयस्क हरणटोळ चा घेर २ सेमी असून लांबी २ मीटर पर्यंत वाधू शकते. तो आपल्या लांब शेपटी चा वापर झाडावर चडताना किव्वा शिकार करताना माकडा सारख्या फांद्यांना पकडायला वापरतो. दुसऱ्या सापांपेक्षा याचे डोके लांब असते, डोक्याच्या टोकाला तोंड आणि नाक असते.
हरणटोळ हा एक धीम्या गतीचा साप असून तो स्वताला वाचवण्यासाठी पूर्णपणे आपल्या त्वचेच्या रंगाच्या झाडांमध्ये गायब होण्याच्या सवयीवर अवलंबून असतो. हरणटोळ हा पाली. सरडे. बेडूक आणि इतर कुर्ताडणाऱ्या प्राण्यांना खातो. तो आपल्या भक्ष डसून त्यामध्ये विष सोडून त्याला अक्क्खा गिळून खातो.
हरणटोळ हा माध्यम विषारी साप आहे, जरी त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून लहान मुलगा आजारी पडू शकतो तर मोठ्यांना माधुमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होते. आजपर्यंत याच्या चावण्याने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाला नाही आहे.
आजकाल हरणटोळ हा अनेक ठिकाणी पेट म्हणून ठेवण्यात येत आहे, जरी स्वभावाने शांत असला तरी कधी कधी चिडून तो चावा घेतो, त्याच्या जबड्याच्या मागील दातांमध्ये विष असते.
बाजारात सुद्धा त्यची विक्री होण वाढलेलं आहे, त्वचेच्या रंगामुळे लोकांच्या पसंतीस आल्यामुळे घरात पाळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचे दुष्परिणाम मात्र सापाच्या जंगलातील संख्येवर आणि बंदिस्त अवस्थेत त्याच मरण्यात होत आहे.

घोणस विषारी साप

घोणस

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरिसृप
कुळ: वायपरीडे
(Viperidae)
उपकुळ: वायपरीने
(Viperinae)
जातकुळी: डाबोया (Daboia)
जीव: डाबोया रसेली
(Daboia russelii)
शास्त्रीय नाव
डाबोया रसेली
घोणस (शास्त्रीय नाव : Daboia, उच्चार: डाबोया; इंग्लिश: Russell's viper) हा आशिया खंडातील भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, दक्षिण चीन, तैवान या भूप्रदेशांमध्ये आढळणारा विषारी साप आहे. हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे.

वास्तव्य

घोणस मुख्यत्वे जंगले तसेच ग्रामीण भाग पसंत करतो.

रचना

घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात

घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.

प्रजनन

घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.

विषाचे परिणाम

घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

उपचार

घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे.

Sunday, 7 February 2016

गवा

गवा [ Indian Gaur / Indian Bison ] या भिमकाय शाकाहारी प्राण्याबद्दल….

जंगलातल्या खूरवाल्या प्राण्यांमध्ये सर्वात ताकदवान नी वजनदार म्हणुन गणल्या जाणाऱ्या गवा अर्थात गवारेडा [ Bos gaurus gaurus ] या प्राण्याबद्दल आपण बऱ्यापैकी अनभिद्न्य असतो. साधारणपणे पुर्ण वाढीचा म्हणजेच ’माजलेला’ नर साडेसहा फ़ुटापर्यंत वाढतो नी वजनाचा विचार करायचा तर एक टनापर्यंत असलेला हा “वजनी” नग १००% शाकाहारी आहे हे सांगुनही अनेकांना पटत नाही. गम्मत म्हणजे गवा हा आपल्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांच्या बोव्हिडी कुटुंबाचा [ Family Bovidae ] सदस्य आहे. या गटात बहुतेक खूरवाल्या प्राण्यांना वरच्या जबड्यात म्हणजेच पटाशीचे दात नसतात आणी मस्त शिंगे असतात. गव्याच्या शिंगांचा विचार करायचा झाला तर, नराला साधारण ४०/४५ इंचांपर्यंत अर्धचंद्राकृती शिंग असतात. मादीची शिंग त्यापेक्षा थोडी कमी लांबीची असतात. ही शिंग अर्थात क्याल्शीयमची बनलेली असतात ज्यांचा रंग बहुतांश पिवळट हिरवट असतो नी टोकाला काळा असतो.
gaur4
गवा हा शब्द जरी उच्चारला तर आपल्या नजरेसमोर त्याच बलदंड पिळदार शरीर येतं. याच कारण म्हणजे त्याच्या शरीराची नैसर्गीक ठेवण ! सहा साडेसहा फ़ूट वाढणारा हा प्राणी तसा लाजाळू असतो. जन्मत: मातकट तपकिरी रंगाचे गवे वाढत्या वयाबरोबर तुकतुकीत काळे होत जातात. शरीराच्या मानाने यांच डोकं लहानच म्हणावं असं असतं. या लहान डोक्यावर, म्हणजेच कपाळावर लहानसा पसरट खळगा असतो ज्यापासून एक उभार [ ridge ] सुरु होवुन मानेपर्यंत गेलेला असतो. गव्याचे कान हे मोठे असतात पण बहुतेक सर्व गायी गुरांप्रमाणे फ़ार तिक्ष्ण नसतात. त्याच बरोबर याची दृष्टीही तिव्र नसते. मात्र या कमतरतेला तिव्र गंधद्न्यान भरून काढतं. गव्यांची घ्राणेंद्रीये फ़ारच तिक्ष्ण असतात व वाऱ्याच्या लहानसहान झुळुकांबरोबर येणारा प्रत्येक गंध ते हुंगतात. गव्याचे पाय त्याच्या शरीराच्या मानाने बारीक वाटले तरी दणकट असतात. त्याच्या वजनी शरीराचा भार पेलायची भक्कम कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. या पायांच वैशिष्ठ्य म्हणजे हे गुढघ्यापर्यंत पांढरट रंगाचे असतात. जणूकाही गव्याने पांढऱ्या रंगाचे मोजे घातले आहेत असाच भास होतो. त्याची शेपटीमात्र त्यामानाने लहान या सदरात मोडते. हिचा बहुतेक उपयोग गवत चरताना शरीरावर बसणाऱ्या किड्यांना हकलण्यासाठीच केला जातो.
gaur2Gaur 1
आधी उल्लेखल्याप्रमाणे, गवा हा १००% शाकाहारी असतो. हे गवे मुख्यत्वे गवत, झाडांची पाने, कोवळे कोंब आणि रानफ़ळे खातात. या खाण्यासाठी ते दिवस रात्र जंगलात फ़िरतात. पहाटे आणि संध्याकाळी गवे चरायला बाहेर पडतात. पण मनुष्यवस्ती जवळच्या जंगलात मात्र गवे रात्री बाहेर पडतात. साधारणत: गवे १० ते १२ च्या कळपात दिसून येतात. हा कळप आकाराने मोठ्या असलेल्या नराच्या अधिपत्याखाली असतो ज्यात काही माद्या व पिल्ले असतात. मोठे झालेले नर आणि वयोवृद्ध नर [ज्यांना एकल म्हणतात] एकेकटे फ़िरतात.प्रत्येक कळपाची आणि एकांड्या नराची स्वत:ची ७०/७५ किलोमिटर्स एवढी हद्द असते ज्यात दुसरे गवे घुसत नाहीत. साधारंण डिसेंबर ते जूनपर्यंत यांचा प्रजननाचा काळ समजला जातो. सर्वात ताकदवर, अर्थात आकाराने मोठा नर सर्वप्रथम कळपातील माद्यांबरोबर समागम करण्याचा अधिकार मिळवतो. समागमानंतर साधारण २७० ते २८० दिवसांच्या गर्भारपणानंतर मादी एकाच पिल्लाला जन्म देते. जन्मत: साधारण २५ किलो असलेल्या ह्या पिल्लाची पुढील नऊ महिने आईकडून काळजी घेतली जाते. वयाच्या २ ते ३ वर्षात हे गवे प्रजननासाठी तयार होतात. मात्र माद्या दोन बाळंतपणांमध्ये साधारण दिड वर्षाचा खंड ठेवतात.

आज जगभर गव्याच्या तीन जाती आढळतात. भारतिय बायसन अर्थात [ Bos gaurus gaurus ] हा भारतिय उपखंडात आढळणारा गवा, थायलंड आणि मलेशिया इथे आढळणारा ’सेलडंग किंवा मलायन गौर [Bos gaurus hubbacki ] जो गव्यांची सर्वात लहान जात म्हणुन ओळखला जातो आणि म्यानमार ते चायना ह्या पट्ट्यात आढळणारा ‘साऊथ इस्ट अशियन गौर’ [ Bos gaurus laosiensis ] जो गव्याची सर्वात मोठी जात म्हणुन ओळखला जातो. ह्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतिय बायसन सर्वात जास्त संख्येन आढ्ळतात. पण शेवटचा गवा [ Bos gaurus laosiensis ] मात्र दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . गवे तसे लाजाळू सदरात मोडत असले तरिही चक्रमच म्हणावे असे वागतात. त्यांच्या तिरसटपणाच्या अनेक सुरस कथा निसर्ग निरिक्षकांमध्ये ऐकवल्या जातात. निसर्गत: २५-३० वर्षाच आयुष्य जगणाऱ्या गव्यांना त्यांच्या आकारामुळे आणि ताकदीमुळे जंगलात शत्रु कमीच असतात. गव्याचे मुख्य शत्रू म्हणुन वाघ, सुसरी आणि मनुष्यप्राण्याकडे बोट दाखवता येऊ शकते. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे , हे गवे तोंडाने मजेशीर आवाज काढतात. प्रजननाच्या काळात गवे तोंडाने शीळ घातल्यासारखा आवाज काढतात. हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकायला जातो. या आवाजाव्यतिरीक्त गवे तोडाने डुरकल्यासारखा काढतात जो कळपासाठी धोक्याचा किंवा एकत्र येण्याचा ईशारा असतो.

गवे मुख्यत: डोंगराळ भागातील जंगले, गवताळ भागात आणि टेकड्यांमध्ये आढळतात. दिवसेनदिवस कमी होत जाणाऱ्या निवासाच्या सुरक्षीत जागा आणि अन्नासाठी करावी लागणारी भटकंती यामुळे गव्यांना धोका निर्माण होतोय. आपल्या देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक सारख्या राज्यांमधे यांच्यासाठी खास राखीव अभयारण्ये बनवली गेली आहेत.

सारंग हरीण

सारंग हरीण

हरीणांचे मुख्य उपकुळ सारंग हरीणे हा सस्तन प्राण्यांमधील एक कुळ आहे. यातील प्राणी हे मुख्यत्वे पायात खुर असतात व त्यांचे खुर विभाजीत अथवा दोन टाचांवरचे असतात. हरीणांचे दोन मुख्य उपकुळे आहेत. सारंग व कुरंग ही दोन्ही हरीणे दिसावयास सारखी असली तरी दोन्ही मध्ये मूलभूत फरक आहे. मुख्य फरक हा शिंगामध्ये असतो.

शिंगे

सारंग हरीणांची शिंगे ही त्यांचे वैशिठ्य आहे. शिंगे ही फक्त नरांना असतात. त्यांची शिंगे ही भरीव असतात व अनेक टोक असतात. पुढे एक टोक असते व मागील बाजुस अनेक टोक असतात. मागील बाजूस दोन किंवा अधिक टोकांची संख्या असते. सांबर व चितळांमध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. शिंगाची वाढ होत असताना त्यावर मखमलीचे आवरण असते. त्यामध्ये रक्तवाहिन्याचे जाळे असते. या काळात हरीणे इतर नरांशी संघर्ष टाळतात. शिंगाची पुर्ण वाढ झाल्यावर मखमलीचे आवरण वाळून जाते व पोपडे पडतात. या काळात नर हरीणे झाडांवर व दगडांवर आपली शिंगे घासून ही पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात. वीणीच्या हंगामात नर हरीणे इतर हरीणांशी संघर्ष करण्यात उत्सुक असतात. एकमेकांशी शिंगे अडकवून नर एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम विजयी नर मादीचा अधिपती होतो. असे नाही की सर्वच नरांना शिंगे असतात. काहिंना नसतात अशी हरीणे साहजिकच मादीच्या कळपावर हक्क सांगण्यास असमर्थ असतात. परंतु काही शिंगरहीत नरही वेगळे डावपेच वापरून इतर नरांना आवाहन करत असतात.


शिंगे नसलेली हरीण मादी पिलू
वावर

सारंग हरीणे ही बहुतांशी अमेरिका अशिया व युरोप खंडात आढळून येतात. अफ्रिकेत प्राण्याचे वैविध्य प्रचंड असले तरी तिथे सारंग हरीणे नाहीत ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सारंग हरीणे ही मुख्यत्वे दाट ते घनदाट जंगलात आढळतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा वावर नसल्यात जमा आहे.

यात खालिल हरीणांचा समावेश होतो

सांबर
चितळ
भेकर
बाराशिंगा
थामिन
रेनडियर
काश्मिरी हंगूल
कस्तुरी मृग
पिसोरी
दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात
त्यामुळे नागाचे विष हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे
आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या
भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे
माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा
नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने
झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम.
आपली हालचाल कमीत
कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर
रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या
विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश
हे जीवघेणे नसतात काही वेळा
कोरडा दंश देखिल होउ शकतो. साधारणपणे १० टक्के
नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे
मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural
systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत
मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू
शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश
झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू
शरीराचे इतर भाग असंवेदनशील
होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा
भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात
पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास
असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे
नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने
जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते
दीड दिवसापर्यंत जाऊ शकतो.

दुर्मिळ तस्कर साप

माळढोक

⁠⁠⁠वैशिष्टे (Characteristics)- जगभरात माळढोकच्या एकूण २२ प्रजाती आढळतात. त्यापैकी एक ‘द ग्रेट इंडियन बस्टर्ड’ म्हणजे आपल्याकडे आढळणारा माळढोक. 
माळढोक पक्ष्याच्या मराठी नावातच त्याच्या निवासचं ठिकाण समावलंय. माळरानावर रहाणारा हा मोठा पक्षी खरंतर माळरानाची शान म्हणावा असाच आहे. ’ओटिडिडाइ’ कुटुंबातल्या (Otididae) ह्या सदस्याला आपल्यामुळेच आज नामशेष व्हायची वेळ आली आहे. मोकळ्या रानमाळ, गवताळ जमिनी आणि साधारण शेतीच्या सान्निध्यात रहाणारे हे पक्षी गिधाडांपेक्षा थोडे मोठे असतात. साधारण लहान शहामृगाच्या आकाराएवढा हा पक्षी असतो
त्यातच, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या महाराष्ट्रात केवळ सहा माळढोक पक्षी उरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधीच जगातील अतिदुर्मिळ प्रजातींमध्ये गणल्या जाणारी माळढोक प्रजाती आता राज्यातून नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरातील माळढोक पक्षी अभयारण्यात केवळ चार तर, अहमदनगर येथे दोन माळढोक पक्षी असल्याचा अंदाज बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा परिसरात माळढोक पक्ष्यांची संख्या ३ किंवा ४ असावी, तर सोलापुरातील नान्नज येथील माळढोक अभयारण्यात ही संख्या २ किंवा ३ असावी. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील परिस्थिती पाहता येथील माळढोक पक्ष्यांची संख्या ४ किंवा ५ असावी असा अंदाज व्यक्त करून गुजरातमध्ये स्थिती थोडी बरी असून, तिथे अवघे १५ माळढोक पक्षी उरल्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातून मात्र माळढोक पक्षी नामशेष झाला आहे. गवताळ प्रदेश हा माळढोक या पक्ष्याचा नैसर्गिक अधिवास असून तोच नाहीसा झाल्याने या देखण्या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत पुरेशी जनजागृती केली जात नसल्याने माळढोक पक्षी दिवसागणिक कमी होत आहेत. एकेकाळी या पक्ष्यांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात शिकार केल्याने माळढोक पक्ष्यांची संख्या घटली. स्वातंत्र्य काळानंतरही या पक्ष्याचे मांस रुचकर लागते असा गैरसमज असल्याने याची अतोनात शिकार होत गेली.
दरम्यान, राजस्थानात अद्यापही विविध भागांत माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व दिसून येते. ‘राजस्थान सरकारच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ‘सेव्ह बस्टर्ड’ या प्रकल्पामुळे आशा पल्लवीत झाल्या असून, या प्रकल्पात माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनांवर वनविभागाकडून समाधानकारक लक्ष ठेवले जात आहे. या प्रकल्पांतर्गत गवताळ प्रदेशाचे संवर्धन, लोकसहभागातून जनजागृती आणि माळढोक पक्ष्याची नित्यनेमाने मोजणी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत वनविभागालाही सरकारकडून प्रेरणा मिळत असून अशा प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रातही राबवला जावा,’ अशी इच्छा विविध निसर्गप्रेमींनी व विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.
माळढोक पक्ष्यांची घटती संख्या हा आता गंभीर विषय झाला असून, यापुढे त्यांच्या संरक्षणाबरोबरच संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन पद्धती स्वीकारावी लागेल. त्याशिवाय माळढोक वाचणार नाहीत. परदेशातही कृत्रिम पद्धतीने प्रजनन करून माळढोकांची संख्या वाढविण्यात यश आले आहे. 

कायदा (Law)- वन्यजीव (संरक्षण) अधिनियम कायद्यानुसार माळढोक या पक्ष्याचा अनुसुची १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या पक्ष्यास पकडणाऱ्या, मारणाऱ्या वा त्यांचा अधिवास नष्ट करणाऱ्या व्यक्तीस ३ ते ५ वर्ष कारावास व २५००० रुपये दंड होऊ शकतो. तसेच या पक्ष्यांची वा त्यांच्या अवयवाची विक्री वा तस्करी करणाऱ्यास ५ ते ७ वर्ष कारावास व ३०००० रुपये दंड होऊ शकतो. तरी असे काही गैरप्रकार होत असल्याची कोणाला काहि खात्रीशीर माहिती असल्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क साधावा हि विनंती. वनपरीक्षेत्र पुणे. फोन- ०२०२४४७२९८९. 

Saturday, 6 February 2016

विषारी व बिनविषारी साप ओळखणे

[2:56 PM, 2/6/2016] +91 99223 26183: विषारी व बिन विषारी साप ओळखण्याची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्या सापामध्ये विषग्रंथी व विषदंत आहेत काही होय. भारतातील महत्त्वाचे विषारी सापखालील खुणांवरून ओळखता येतात.
(१) समुद्र साप : शेपटी दोन्ही बाजूंनीच पटी असते. (२) फुरसे (व्हायपर) : उदर शल्क मोठे, डोके त्रिकोणी आकाराचे व त्यावर लहान शल्क, डोळे व नासिका यांधील भागावर लोरियल शल्क अथवा खाच असते. (३) नाग : नासिका आणि डोळ्यांना स्पर्श करणारे तिसरे ऊर्ध्व ओष्ठ शल्क व फण्यासह मान असते. (४) मण्यार : काळसर रंग, पृष्ठमध्य शल्क मोठे व षट्‌कोनी तर पुच्छशल्क अखंड असते.
आ.२. विषदंत व विषग्रंथी दाखविणाऱ्या फुरसे सापाचा जबडा : (१)विषदंत, (२) विषदंताचा आतील बाजूस वळलेला पोकळभाग, (३) विषदंतावरील आवरण, (४) विषनलिका, (५) विषग्रंथी, (६)आतीलबाजूसवळलेलेदंत, (७)जीभ.
विषसाधन : विषारी सापाच्या वरच्या जबड्यात विष ग्रंथीव विषदंत असतात, यांस ‘विषसाधन’ म्हणतात. लालाग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. विषग्रंथी डोळ्यांच्या मागील बाजूस असतात. या विषग्रंथींपासून निघालेल्या विषनलिका वरच्या जबड्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या विषदंतांत उघडतात. विषदंत दोन असून ते जबड्यातील इतर दातांपेक्षा मोठे, पोकळ व आतील बाजूस वळलेले असतात. नागाचे विषदंत उभे तर फुरशाचे आडवे असतात. काही कारणाने विषदंत पडले, तर नवीन विषदंत तयार होतात.
दंश करण्यापूर्वी साप डोके उंच करून शरीर थोडे मागे घेतो व क्षणार्धात भक्ष्य किंवा शत्रूचा चावा घेतो. साप चावा घेताना विषदंताच्या साहाय्याने विषग्रंथीतील विष भक्ष्य किंवा शत्रूच्या शरीरात सोडतो. विष सोडताना खालचा जबडावरच्या दिशेने ओढला जातो. चावा घेताना जबड्याच्या हालचालीसाठी कवटीतील अस्थी व स्नायूयांची मदत होते. भक्ष्याच्या किंवा शत्रूच्या शरीरात विष सोडल्यावर सापाच्या मानेचे स्नायू शिथिल होतात व तो विषदंत बाहेर खेचून घेतो.
सापाच्या विषग्रंथीतील विष एका चाव्यात संपत नाही. तो अनेक चावे घेऊ शकतो. नागाचे विष फिकट पिवळसर, पारदर्शक व काहीसे चिकट असते. फुरशाचे विष कधी पिवळसर तर कधी पांढरे असते. या विषामुळे भक्ष्य बेशुद्घ पडते. त्यामुळे सापाला भक्ष्य पकडून खाणे सोपे जाते. विष पचनास मदत करते. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी सापाला विषाचा उपयोग होतो. विषारी सापाच्या पिलांमध्ये जन्मतः पहिल्या दिवसापासून विष असते. सुमारे ६५% सर्पदंश रात्री आणि ३५% दिवसा झाल्याचे..
🐍🐍🐍🐍सर्पमित्र बापुसाहेब सोनवणे
[3:03 PM, 2/6/2016] आबाजी पोखरकर: 👌🏻👌🏻👌🏻
[3:03 PM, 2/6/2016] +91 93718 28156: 👍👍 nice info.





सापाविषयी माहिती - समज गैरसमज
समज: नाग आणि इतर साप वेगळे आहेत. नाग हा साप नाही.
सत्य: नाग हा ही एक सापच आहे. सापाचे सर्व गुणधर्म नागात आहे. जातीनुसार त्यात कमी अधिक प्रमाणात फरक आहे. त्यात विषाचे प्रमाण सर्वात अधिक व प्राणघातक असते.
समज: साप दूध पितो. तो गाईच्या सडाला तोंड लावून दूध पिल्याच्या आख्यायिका.
सत्य: साप दूध पित नाही.दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. त्याला रानावनात दूध मिळू शकत नाही. तो दूध पचवूच शकत नाही. चुकून दूध पिला तर त्याला त्रास होईल. गाईच्या सडाला तोंड लावून दूध पितो ही निव्वळ भाकडकथा आहे. एक तर गाय त्याला जवळ येऊ देणार नाही आणि दूध प्यायलाच तर दात लागून गाय मरण पावेल.
समज: सापाला संगीत/नागीण धुन आवडते. साप पुंगीच्या तालावर डोलतो.
सत्य: सापाला कान नसतात. त्याला कुठल्याही प्रकारचे संगीत आवडत नाही.
जमिनीच्या कंपनांमुळे त्याला शत्रू
च्या हालचालींची जाणीव होते.
समज: सापाच्या डोक्यावर नागमणी असतो.
सत्य: चित्रपटातून सापाचे अवास्तव चरित्र रंगवले गेले आहे. धनावरचा साप ही केवळ एक कल्पना आहे.
समज: साप डुख धरतो. सापाला दूरचे दिसत नाही. त्याला चेहरा लक्षात ठेवता येत नाही. त्यामुळे साप डुख धरतो हा समज चुकीचा आहे.
म्हणून सापाला मारू नका. जवळच्या सर्पमित्रांचा मोबाईल नंबर नेहमी सोबत
किंवा आपल्या डायरीत असू द्या. हजारो उंदरांना खाऊन शेतकऱ्यांचे होणारे फार मोठे नुकसान साप कमी करतो. त्यामुळे
सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.
समज: नाग-नागीण इच्छाधारी असतात. साप अमर असतात.
सत्य: ही फक्त एक कल्पना आहे. वास्तवात इच्छाधीरी साप ही गल्लाभरू सिनेमांची पैसा कमविण्याची अवास्तव कल्पना आहे. ते अस्तित्वात नाही.
सापाच्या भारतातील विषारी जाती-
१) नाग
२) फुरसे
३) घोणस
४) मण्यार
इतर सर्व साप बिनविषारी आहेत.
सर्प दंश झाल्यास तत्काळ प्रथमोपचार करून इस्पितळात दाखल करावे.
🐍🐍🐍
बापुसाहेब सोनवणे

सर्पदंश

विषारी साप चावल्यावर त्यावर उतारा वा उपाय म्हणून प्रतिविष टोचावे लागते. हे प्रतिविष भारतात ‘हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई’ या संस्थेत तयार केले जाते. या प्रतिविषामुळे सर्पविषाचे उदासिनीकरण होते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हे प्रतिविष १० मिली. शिरेतून लवक्ररात लवक्रर द्यावे. एका तासाने तिच्यात विषबाधेची लक्षणे आढळत असल्यास पुन्हा प्रतिविषाची दुसरी मात्रा द्यावी. फुरसे चावल्यास सर्पदंशाच्या जखमेभोवती थोडे प्रतिविष टोचावे लागते, त्यामुळे जखम चिघळत नाही. विषबाधेची लक्षणे जोपर्यंत आढळतात, तोपर्यंत दर दोन तासांनी प्रतिविषाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) द्यावी लागतात.
प्रतिविष तयार करताना तगड्या घोड्यांना नाग, मण्यार, घोणस व फुरसे यांचे सौम्य विष विद्राव म्हणून टोचतात. त्यामुळे घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके (अँटिबायॉटिक) तयार होतात. ती सर्पविषाचा परिणाम नष्ट करू शकतात. घोड्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार झाल्यावर अशा घोड्याचे रक्त काढून यातून रक्तद्राव वेगळा करतात. हा द्राव सुकवितात. त्याची भुकटी (पावडर) तयार करतात. ही भुकटी सर्वसाधारण तपमानात ५-६ वर्षे उपयोगात आणता येते. १० मिली.च्या काचेच्या कुपीतून ती दवाखान्यात उपलब्ध असते. ॲलर्जी असलेल्या व्यक्तीस प्रतिविष टोचल्यास अगोदर ॲड्रेनॅलीन हे औषध टोचावे लागते.
सर्पदंश कसा टाळावा
सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी : (१) रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. (२) अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे; त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. (३) साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता असते. (४) घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. (५) घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील,तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. (६) घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये, केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात. (७) झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. (८) मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. (९)जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत





Sunday, 31 January 2016

D.A calculater

https://www.dropbox.com/s/ztpuf59kz67uiyv/DA%20Calculater%20D.A.calculater9%20Month.xlsx?dl=0

Thursday, 28 January 2016

your food is your medicine

तुमचे रोजचे अन्न हेच तुमच्या आजारावरचे औषध आहे .

सर्पमित्र






सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.
सापांच्या सु. २,५०० जाती असून भारतात ३४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती असून त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.
सापांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासात त्यांचे १० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहेत. मानवनिर्मितीच्या अगोदरपासूनच साप पृथ्वीवर अस्तित्वात होते. सरीसृपांच्या क्रम-विकासात (उत्क्रांतीत) प्रथम सरडे व त्यानंतर साप निर्माण झाले. पूर्वी सापांना लहान पाय होते; परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व क्रमविकासात पाय अनावश्यक ठरल्याने हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले.
अधिवास
साप सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशांत, दलदली जवळ व पर्वतावर सापांचे वास्तव्य असते. उष्णकटिबंधातील जंगलात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. वाळवंटात राहणाऱ्या या सापांच्या अंगावरील खवल्यांना बारीक उंचवटे असतात, त्यामुळे वाळूवरून सरपटताना त्यांना पकड मिळते. या सापांच्या डोक्यावरील भागास उंचवटे असल्याने त्यांना वाळूत पुरून घेण्यास मदत होते. रेड स्पॉटेड स्नेक व रजतवंशी (रॉयल स्नेक) हे वाळवंटात राहणारे साप आहेत.
काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात; उदा., वाईन स्नेक, उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक). नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या या सापांना पाणसर्प म्हणतात. या सापांची नासाद्वारे डोक्याच्या वरील बाजूस असतात. त्यांना श्वसनासाठी पूर्ण डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज भासत नाही. उदा., विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड इत्यादी.
साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वतः बिळे तयार करत नाहीत. मुंग्यांच्या वारूळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात.
जगात सर्वांत लांब असणारा बिनविषारी साप पायथॉन रेटिक्युलेटस [ ⟶ अजगर] हा असून त्याची लांबी ११–११·५ मी. असते. ⇨ ॲनॅकाँडा याची लांबी सु.९ मी. व वजन सु. ५०० किग्रॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये सर्वांत लहान ⇨आंधळा साप (ब्लाइंड स्नेक) हा असून त्याची लांबी सु. १० सेंमी. असते. ⇨नागराज (किंग कोब्रा) हा विषारी सापांतील मोठा साप असून त्याची लांबी ४·५–५·४ मी. असते. वजनाने मोठा व विषारी साप ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक हा असून त्याची लांबी २-३ मी. व वजन सु. १५·५ किग्रॅ. असते. विषारी सापांमध्ये सर्वां लहान साप स्लाईड स्नेक (वार्म स्नेक) हा आहे.
हालचाल
साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जातो. तो सरपटताना तोंडापासून शेपटीपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर करतो. त्याच्या शरीरात १००–३०० मणके (कशेरुक) असतात. प्रत्येक मणक्यास दोन बरगड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे त्याचे शरीर लवचिक व सहज वळण्यासारखे बनते. शरीर जमिनीला सपाट ठेवून त्याच्या शरीराला ‘S’ आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक व जमीन अशा कठिण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकत असतो.
अजगर व घोणस यांसारखे वजनाने जड साप सरळ रेषेत सरपटत पुढे जातात. त्यांचे पोटाखालचे अधर शल्क पृष्ठभागामध्ये घट्ट रोवतात व त्वचेच्या आतील शरीर स्नायूंसह पुढे सरकते. अधर शल्काची पकड ढिली होते. तेव्हा ते पुढे सरकतात व पुन्हा पृष्ठभागात घट्ट पकड घेतात. या पद्घतीत सर्व शरीर जमिनीला घासत असल्याने या सापाचा वेग मंद असतो. रेताड प्रदेशातील सापाची वक्रगती (वेलांटी) चाल असते. ज्या दिशेला त्याला पुढे जायचे त्या दिशेच्या काटकोनात तो शरीर सरकवितो. पुढे सरकताना साप डोके व मान जमिनीपासून वर उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो; जमिनीवर प्रथम मान व नंतर शेपटी टेकते. शेपटी जमिनीवर टेकल्यावर पुन्हा डोके व मान उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो. कोकणात आढळणारा फुरसे हा साप या पद्घतीने हालचाल करतो.
सगळेच साप पाण्यात पोहू शकतात; परंतु पाण्यात दीर्घकाळ पोहण्याची व राहण्याची क्षमता फक्त पाणसर्प या सापामध्ये आहे