नमस्कार मी बापूसाहेब सोनवणे आपले स्वागत करतो.



सुस्वागतम शैक्षणिक माहितीबरोबरच इतरही अनेक प्रकारची माहिती देणाऱ्या या व्यासपीठावर आपले स्वागत आहे.

सर्प जनजागृती

नाग


नाग हा विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे.
नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडे इतर छोटे प्राणी व पक्षी[१] आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.[२] . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.


 नागाचे विष
दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात त्यामुळे नागाचे विष हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखिल होउ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते दीड दिवसापर्यंत जाऊ शकतो.
प्रतिविष नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार )प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते [३].


गैरसमज
नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे[६]
  

नाग दूध पितो-  

वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे नाग दूध पीत नाही.नाग गारुड्याच्या पुंगीपुढे नाचतो(डोलतो) - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारूडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारूडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.नागीणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो.(ग्रामीण भागात याला डूख धरणे असेही म्हणतात.) 

नागाच्या डोक्यामध्ये नागमणी  नसतो .

No comments:

Post a Comment